in ,

‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होणं गरजेचं’

सध्या लस मिळणं आवश्यक आहे. राज्य सरकार लस खरेदी करण्यासाठी तयार आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. तिसरी लाट येऊ नये हीच अपेक्षा. त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे, असं मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

कोरोना संकटात ऑक्सिजनची भूमिका महत्त्वाची आहे. ऑक्सिजन बाहेरून आणणं सोपं नाही. अहमदनगरमध्ये ७ ऑक्सिजन प्लांट उभे करत आहोत. दररोज २५० जम्बो सिलिंडर भरून निघतील इतकी क्षमता आहे. मात्र, हे ऑक्सिजन प्लांट सक्रिय व्हायला १ ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असंही थोरात म्हणाले.

सहकारी संस्था मदत करत आहेत. ऑक्सिजनची निर्मिती सहकारी संस्थांनी करावी. वसंतदादा शुगर सहकारी कारखान्यानं आवाहन केलं होतं. तिसऱ्या लाटेपूर्वी ऑक्सिजनची तयारी करण्याला आमचं प्राधान्य आहे, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.

सातव यांची प्रकृती स्थिर –

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मी पुण्यातील डॉक्टरांशी यांसदर्भात चर्चा केली आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राजीव सातव लवकरच बरे होतील, असंही थोरात म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन

देशात कोरोना विस्फोट : पहिल्यांदाच रुग्णसंख्या ४ लाखांहून अधिक