in ,

‘देर आए’….विजयी मिरवणुकांवर बंदी; निवडणूक आयोगाचा निर्णय

पश्चिम बंगालसह इतर ४ राज्यांमध्ये विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. त्याचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं उशिरानं का होईन एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. निकालाच्या दिवशी आणि त्यानंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांना आता विजयानंतर जल्लोष करता येणार नाही.

पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.

येत्या २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान करोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णा द्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणी घेतली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरलं पाहिजे, असं मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केलं. निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आयोगाला दिला होता.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

त्या रात्री मी पोलीस ठाण्यात गेलो होतो? कारण…

1 तारखेला लसीकरण कसे करावे; यावर राजेश टोपेंनी व्यक्त केली चिंता