बहुचर्चित राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह ६५ संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालामध्ये अजित पवार यांच्यासह ६५ संचालकांना क्लिन चिट देण्यात आली आहे.

राज्य सहकारी बँक कथित घोटाळा २५ हजार कोटी रुपयांचा होता. प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, आनंदराव आडसूळ आदिंच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्याच्या सहकार विभागाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीचे गठन केले होते.

या समितीने या प्रकरणाचा अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. या चौकशी समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह एकूण ६५ संचालकांना दिलासा मिळाला असल्याची माहिती मिळत आहे.