in ,

शेतकऱ्यांचे महामार्गावर मृदुंग वाजवत भजन आंदोलन

गजानण वाणी | हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग वाजवत भजनाच्या स्वरुपात आंदोलन केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मूग , उडीद सोयाबीन, कापूस यांसह इतर पिकांचे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ विनाअट सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी अजित मगर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली / नांदेड महामार्गावर कळमनुरी येथे टाळ मृदुंग वाजवत शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केले. या आंदोलनात शेतकऱ्यांना विना अट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पिक विमा मंजूर झालाच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहीजे अशा मागण्या सरकारपुढे मांडल्यात. यावेळी रोडच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

समाजसेवक अनिकेत आमटे चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वच्छतादूत

पेट्रोल परवडत नाही, 80 लाखांची गाडी कशावर चालणार; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला