in

‘भूल भुलैया २’मध्ये ‘ही’ अभिनेत्री असणार मोंजोलिका

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा हिट चित्रपट ‘भूल भुलैया’चा पुढील पार्ट नव्या कास्टसोबत येण्यास तयार झाला आहे. अभिनेत्री विद्या बालनने (Vidya Balan) एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2007 साली प्रदर्शित झालेल्या भुलभलैया या चित्रपटात विद्या बालनने मंजुलिकाचे पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे विद्या बालनला एक वेगळी ओळख मिळाली. मंजुलिकाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आता पुन्हा एकदा  त्याच व्यक्तिरेखेसह विद्या बालन मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

‘भूल भुलैया २’मध्ये कार्तिक आर्यन, तबू आणि कियारा आडवाणी याचे नाव निश्चित झाले आहे. या चित्रपटातील कार्तिकचा लूक खूप व्हायरल झाला होता. या चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे मोंजोलिका आहे.

अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया २’मध्ये विद्या बालन मोजोंलिकाच्या रुपात दिसणार आहे , मिड-डेने सुत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. माहितीनुसार, जेव्हा विद्याने अनील बज्मीच्या थँक्यू चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती, तेव्हापासून विद्या अनिल बज्मी यांच्यासोबत काम करत आहे. विद्या बालनने केलेले राजेशाही नर्तिकेचे भूत मोंजोलिकाचे पात्र अविस्मरणीय आहे. आता विद्या बालन पुन्हा एकदा भुल भुलैया २ मध्ये दिसणार का? आणि ‘आमी जे तोमार’ गाण्यावर डान्स करणार की क्लायमॅक्समध्ये दिसणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेल.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अडकणार लग्न बंधनात?

‘KGF 2’चे प्रदर्शन लांबणीवर? जाणून घ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख