in

आषाढी वारी संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरु आहे. राज्यात आजही अनेक ग्रामीण जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पटीने वाढल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम,सणसमारंभावर निर्बंध आले. पंढरपूरची आषाढी वारीही गेल्या वर्षी रद्द करण्यात आली होती. मात्र याच संदर्भात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मानाच्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत. त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची एक बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Price | पेट्रोल डिझेलने घेतला भडका

परवाना संपलेल्या मेडिकलवर कारवाई; लाखोंचा औषध साठा जप्त