in

‘मी कुणाला घाबरत नाही’, दादूसनी तृप्ती आणि विशालला सुनावलं

‘बिग बॉस मराठी ३’ची दिवसेंदिवस रंगत वाढतच आहे. मत देण्यावरून संतोष चौधरी अर्थात दादूस यांनी तृप्ती यांना सुनावल्याचं दिसत आहे. सध्या घरात कॅप्टन पदासाठी टास्क सुरू आहे. त्यात सगळेच सदस्य मतं मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात कॉलेज भरलंय तर दुसरीकडे मत मिळवण्यासाठी सदस्य एकमेकांना मनवताना दिसत होते.

त्यातच मत देण्यावरून संतोष चौधरी अर्थात दादूस यांनी तृप्ती यांना सुनावल्याचं दिसत आहे. घरात मिळणाऱ्या मतांवर कॅप्टन कोण होणार, प्रत्येकजण आपलं मत कोणाला द्यायचं हे ठरवत आहे. तृप्ती देसाई आणि विशाल निकम मतांसाठी दादूस यांची समजूत काढताना दिसतात. दादूस यांनी टीम ए म्हणजेच उत्कर्ष, गायत्री यांच्या टीमला मत द्यायचा शब्द दिला आहे. पण त्यामुळे तृप्ती आणि विशाल त्यांची समजूत काढताना दिसतात. तृप्ती दादूस यांना सांगते , ‘तुम्ही त्यांना मत दिलं तर ते तुमच्यासाठी अवघड होईल.’त्यावर दादूस तृप्ती आणि विशाल यांना प्रतीउत्तर करतात, ‘माझ्यासाठी अवघड होईल म्हणजे? मला काही अवघड होणार नाही. मी कुणाला घाबरत नाही. मी स्वतःचा खेळ खेळतोय. मला वाटेल त्यालाच मी मत देणार. मी कुणाला बांधील नाही.’ असे उत्तर दादुसने दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोलकाता समोर १९३ धावांचे आव्हान

IPL 2021 Final | आयपीएलच्य़ा 14 व्या पर्वावर चेन्नईने कोरले नाव