in

मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण; ”माझ्या वक्तव्याचा मला खेद नाही”

सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती आणि भाजप नगरसेविका सिद्धी पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. या प्रकरणी सिद्धी पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरून बांधकाम सभापती आणि भाजप नगरसेविका सिद्धी पवार यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगारास चांगले फैलावर घेतले. त्यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना शिवीगाळ करून गळा चिरून टाकेन अशी ऑडिओ क्लिप साताऱ्यात चांगलीच व्हायरल झाली आहे.

माझ्या वक्तव्याचा मला खेद नाही

प्रभागात कामे होत नसल्याने भाजप नगरसेविका आणि सातारा पालिकेच्या सभापती सिद्धी पवार यांनी मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांना अपशब्द वापरत गळा चिरून टाकेन असे विधान केल्याने खळबळ उडाली असून ही ऑडिओ क्लिप साताऱ्यात व्हायरल झाली आहे.. यावर बोलताना पवार म्हणाल्या..एक सातारकर म्हणून हा माझ्या भावनांचा उद्रेक आहे..लोकांची विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला मला सामोरे जावे लागत असल्याने मला संताप अनावरण झाला असून लोकांच्या झालेल्या भावनाविवेशामुळे मला बोललेल्या वक्तव्याचा अजिबात खेद नसल्याचे भाजप नगरसेविका आणि पालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी सांगितलंय.

जबाबदारीने वक्तव्य करावीत

यावर बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले प्रत्येकाने जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे.काम करत असताना अडचणी निर्माण होतात समतोल बिघडता कामा नये.. ऑडिओ क्लिप व्हायरल कशामुळे झाली मला माहिती नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.मात्र अशी वक्तव्य करणे लोकप्रतिनिधी म्हणून मला अनपेक्षित असल्याचे सांगत पालिकेच्या चाललेल्या कारभाराबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे..

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थितीसाठी 1200 रुपये भत्ता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला गोवर्धनचे सरपंच गजानन वानखेडे यांच्याशी संवाद