in

भाजपा नेत्यांचा ‘अ‍ॅरोगन्स’ हे बंगलाच्या पराभवाचे कारण,सामनातून टोला

शिवसेनेचा अग्रलेख सामनातून विरोधकांवर टीकेचे सूर उमटत असतात. राज्यात सगळेच दिवस हे सारखे नसतात. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांना दिलेल्या धमकीवजा इशाऱ्याबद्दल प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या. त्यांचे अभिनंदन करणाऱ्या भुजबळ यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकी देण्याचा इशारा दिला. अशा सतत धमक्या देऊन भाजपा आपली उरलीसुरली पत का घालवत आहे? महाराष्ट्रातील मंत्र्यांना-आमदारांना विरोधी पक्षाचे लोक अशाप्रकारे धमक्या देणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला पाहिजे,” असा सल्ला शिवसेनेच्या अग्रलेखातून दिला आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर पोटनिवडणूक भाजपा जिंकले.

भाजापचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. हा लोकशाहीचा कौल सगळ्य़ांनीच मान्य केला. त्याबद्दल विरोधकांनीही भाजप आणि आवताडे यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. पंढरपुरात जिंकलेल्या आवताडे यांचे अभिनंदन करणाऱ्यांना बघून घेऊ, अशी भाषा कोणी केल्याचे दिसत नाही. भाजपचा आनंद कशात तर नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पराभूत झाल्या यात. नंदीग्रामची जागा कठीण किंवा गैरसोयीची आहे म्हणून ममता दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघात उभ्या राहिल्या नाहीत. सुरक्षित राजकारण ममता बॅनर्जी यांनी केले नाही. त्यांनी आव्हान स्विकारले व त्याचाही बंगाली जनतेच्या मानसिकतेवर परिणाम झाला. ममतांचा हाच बेडरपणा बंगाली जनतेला आवडला. ममता बॅनर्जी एकहाती एका पायावर लढल्या.

भाजपाच्या पराभवाचे थडगे नंदीग्राममध्येच बांधले गेले, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.पंढरपुरात भाजपचा विजय झाला त्याबद्दल ‘विठोबा माऊली पावली’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली म्हणून कोणी विठोबा माऊलीवर राग धरेल काय? त्याच विठोबा माऊलीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले व महाविकास आघाडीचे सरकार आले. संपूर्ण बंगाल दोनेक महिने ‘जय श्रीराम’च्या गर्जनांनी घुमत होता, पण ‘जय श्रीराम’नेही भाजपच्या विजयासाठी त्यांचे कोदंड धनुष्य उचलले नाही.आता ममतांचा विजय झाला म्हणून महाराष्ट्रातील भाजपवाले श्रीरामास पुन्हा वनवासात पाठवण्याची धमकी देणार का? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गांधीविचारक सुमनताई बंग यांचे निधन

यशराज फिल्म्सच्या वतीनं 30,000 लोकांचं मोफत लसीकरण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र