in

‘हे सरकार म्हणजे पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांचं सरकार’

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जोरदार हल्ला चढवला आहे. या सरकारच्या मागील २ वर्षांचं वर्णन करायचं असेल तर पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्याभोवती फिरणारं सरकार असंच म्हणावं लागेल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

तसेच या २ वर्षांतील ७५० पेक्षा अधिक दिवसांमध्ये सरकार केवळ मंत्र्यांच्या पुत्र, पुत्री आणि पुतण्याभोवती फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.

आशिष शेलार म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्यानं वृत्तपत्रांमध्ये जाहिराती येत आहेत. महाविकासआघाची सरकारच्या २ वर्षांचं वर्णन करायचं असेल तर पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्याभोवती फिरणारं सरकार असंच म्हणावं लागेल. या सरकारच्या काळात जनतेची कामं होणं अपेक्षित होतं, पण २ वर्षात ७५० पेक्षा अधिक दिवसात लोकांची कामं झाली नाही. हे सरकार केवळ राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांचे पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्याचभोवती फिरतंय.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मविआ सरकारची दोन वर्षे; चंद्रकांत पाटील म्हणाले…

वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली पिकअप गाडी; 5 जणांचा जागीच मृत्यू