in

गडबड घोटाला ! भाजपाच्या प्रचार व्हिडिओत चिदंबरम यांच्या सुनेची डान्स क्लिप

तामिळनाडू विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तामिळनाडू भाजपानं निवडणूक प्रचारासाठी तयार केलेल्या व्हिडिओमध्येच चूक झाल्याचं आता समोर आलं आहे. भाजपानं चक्क माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सुनेच्या नृत्याचीच क्लिप आपल्या प्रचाराच्या व्हिडिओत समाविष्ट केली आहे.

व्हिडिओ बनवताना तामिळनाडू भाजपानं त्यात काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची सून आणि कार्ती चिदंबरम यांच्या पत्नी श्रीनिधी चिदंबरम यांच्या नृत्याची क्लिप घेतली आहे. श्रीनिधी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून त्या नृत्यांगनाही आहेत. त्यांच्या भरतनाट्यम नृत्याचा काही भाग भाजपानं आपल्या व्हिडिओत वापरला आहे. यावरुन आता खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या चुकीवरून तामिळनाडू काँग्रेसनं भाजपावार जोरदार हल्ला केला आहे. टि्वट करत काँग्रेसनं भाजपला खडेबोल सुनावले आहेत. ‘सहमती घेणं ही तुमच्यासाठी अवघड गोष्ट आहे हे आम्ही समजू शकतो. मात्र, तुम्ही परवानगीविना श्रीनिधी यांचे फोटो, व्हिडिओ वापरू शकत नाही. तुमची मोहीम पूर्णपणे असत्य आणि प्रचारांनी भरलेली आहे हेच यातून दिसून येत आहे, असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेना प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर; ‘या’ 16 जणांना मिळाली संधी

सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा ‘हा’ फोटो टि्वट करत काय म्हटलंय?