in

७२ तास ७२ शेतकऱ्यांसह भाजपचं अन्नत्याग आंदोलन

वैभव बालकुंदे, लातूर | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी शेतकरी हत्या प्रकरणात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला असतानाच, विरोधी पक्ष भाजपने शेतकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन सूरु केले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजारांची मदत देण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले आहे.

शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजारांची मदत देण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि रमेश कराड यांनी ७२ तास ७२ शेतकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरु केलंय. आज सकाळपासून सुरु झालेलं हे अन्नत्याग आंदोलन तीन दिवस म्हणजेच ७२ तास चालणार असून दोन्ही आमदारांनी आणि आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी ७२ तास अन्नत्यागाचा निर्णय घेतलाय . या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला अल्टिमेटम देण्यात आला असून आज सायंकाळपर्यंत सरकारनं हेक्टरी ५० हजार आणि बागायतीसाठी एक लाख अशी मदत जाहीर करावी अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.

अतिवृष्टीमुळं लातूर जिल्हयात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ मदत देणं गरजेचं असताना हे सरकार नेमकं कशाचे पंचनामे करतंय हेच कळत नसल्याचं सांगत भाजप आमदार तथा माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवरात्रीनिमित्त साकारली 340 चौरस फुट रांगोळी

भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने; भुसावळमध्ये राडा