in

भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या नमिता गुरव बिनविरोध

अभिजीत हिरे, भिवंडी | भिवंडी पंचायत सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नमिता निलेश गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सभापती पदासाठी भाजपाच्या सदस्य निमिता गुरव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.या निवडीनंतर सर्व पंचायत समिती सदस्यांसह अनेक हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

42 सदस्य असलेल्या भिवंडी पंचायत समितीत शिवसेना 20 ,भाजपा 19, काँग्रेस 2 ,मनसे 1 असे पक्षीय बलाबल असून शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक पातळीवर झालेल्या समझोत्यानुसार मागील दीड वर्षांपासून सभापती व उपसभापती पदावर आलटून पालटून दोन दोन महिन्यांकरीता शिवसेना भाजपा लोकप्रतिनिधींना संधी दिली जाते.

सभापती पदी असलेले शिवसेनेचे रविकांत पाटील यांनी आपापसात ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या निवडीकरीता विशेष सभेचे आयोजन तहसीलदार तथा पिठासन अधिकारी अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सभापती पदासाठी भाजपाच्या सदस्य निमिता गुरव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.या निवडी नंतर सर्व पंचायत समिती सदस्यांसह अनेक हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उस्मानाबादेत विजयादशमी निमित्त साकारली 289 चौरस फुट रांगोळी

समाजसेवक अनिकेत आमटे चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वच्छतादूत