in ,

Bollywood Actor Ajaz Khan arrested| शादाब बटाटाने तोंड उघडलं, अभिनेता एजाझ खान NCB च्या ताब्यात

काही दिवसांपूर्वी ड्रग्ज माफिया फारुख बटाटाचा मुलगा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटाला NCB ने अटक केली होती. या संदर्भात आता नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. ड्रग्ज माफिया शादाब बटाटा याच्या चौकशीतून एजाझचं नाव उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी बिग बॉस फेम बॉलिवूड अभिनेता एजाझ खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतलं आहे. राजस्थानहून मुंबईत पोहोचताच एअरपोर्टवर एजाझला ताब्यात घेतलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एजाझ खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे. काही मालिकांमध्येही अभिनय केला आहे. परंतु तो बिग बॉसच्या सातव्या सिझनमुळे चर्चेत आला. एक्टसी टॅबलेट्सच्या माध्यमातून ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी ऑक्टोबर 2018 मध्येही अटक झाली होती. जुलै 2019 मध्ये धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एनसीबीने अटक केलेला शादाब हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया फारुख बटाटा याचा मुलगा आहे. मुंबईतील मोठे पब त्याचप्रमाणे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकांना शादाब ड्रग्स सप्लाय करायचा असा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. शादाब बटाटा हा फारुख बटाटा यांचा मुलगा असून फारुख बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया आहे. एनसीबीने शादाबला मिरारोड येथून तर शाहरुखला वर्सोवा येथून ताब्यात घेतले. त्यावेळी शादाबच्या घरी 1.60 ग्रॅम MD, 61 मेफेड्रोनही जप्त करण्यात आले.

कोण आहे फारुख बटाटा?
शादाब बटाटा हा फारूक शेख उर्फ फारुख बटाटा याचा मुलगा आहे. फारुख बटाटा हा जेव्हा सुरुवातीला मुंबईत आला तेव्हा तो बटाटा विकायचा. यामुळे त्याचं नाव फारुख बटाटा अस झालं. बटाटे विकता विकता फारुख मुंबईत ड्रग्स विकणाऱ्या गँगस्टर यांच्या संपर्कात आला. आणि मग तो ही ड्रग्स विकू लागला. गेल्या काही वर्षात तो ड्रग्जचा मोठा व्यापारी झाला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Kerala Election: केरळच्या दोन्ही आघाड्यांमध्ये ‘मॅच फिक्सिंग’… पंतप्रधानांचा काँग्रेस आणि डाव्यांवर निशाणा

Ramnath Kovind Health | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावरील बायपास शस्त्रक्रिया यशस्वी