in

Bollywood in shock | अभिनेता अमित मिस्त्रीचे निधन

लोकप्रिय गुजराती अभिनेता अमित मिस्त्रीचे निधन झाले. आज २३ एप्रिल रोजी अमितने अखेरचा श्वास घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. सिनेमा रेअरने ट्वीट करत अमितच्या निधनाची बातमी दिली. एका मुलाखतीत अमितने त्याच्या शिक्षणाबद्दल आणि कॉलेजमध्ये असतातना केलेल्या अभिनयाबद्दल सांगितले होते.

अमितने लॉचे शिक्षण केले होते.अमितने अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्याला छोट्या पडद्यावर काम मिळालं. त्यानंतर त्याने २००० मध्ये प्रीति झिंटाच्या ‘क्या कहना’ या चित्रपटात भूमिका साकारली आहे.काही दिवसांपूर्वी अमितची ‘बंदिश बँडिट्स’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती.

या सीरिजमधील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या व्यतिरीक्त अमितने क्या कहना, एक चालीस की लास्ट लोकल, ९९, शोर इन द सिटी, यमला पगला दीवाना सारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. ‘भूत पोलिस’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021: पंजाब किंग्सची आज मुंबईशी लढत

”माझ्या निधनाची इतकी कसली घाई”, निधनाच्या ट्विटवर सुमित्रा महाजन म्हणाल्या….