in

नगरसेवकाला तब्बल ५० लाख रुपयांची लाच घेताना अटक

अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी केली होती पैशांची मागणी

commercial illustrator

अभिजीत हिरे

अनधिकृत दुकाने तोडण्याबाबत महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेण्यासाठी दुकानदाराकडून ५० लाखांची लाच घेताना भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकाला बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सिद्धेश्वर कामुर्ती (वय ६२) असं अटक करण्यात आलेल्या लाचखोर नगरसेवकाचं नाव आहे.

भिवंडी शहरातील मौजे कामतघर हद्दीतील महसूल विभागाच्या नावे सर्व्हे क्रमांक 42/अ/3 ही 60 गुंठे ही जागा आहे. परंतु सदर जागा भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ताब्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी देण्यात आली होती. परंतु या जागेवर व्यवसायिक गाळे उभारण्यात आले होते.

सदर गाळे पालिकेने रस्ता रुंदीकरणात तोडले असता भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून 67 गाळे उभारण्यात आले असून या बाबत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महानगरपालिका व महसूल विभागाकडे तक्रार करून सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आर्यन खानच्या याचिकेवर आज सुनावणी

दसऱ्याच्या खरेदीसाठी दादर मार्केटमध्ये नागरिकांची झुंबड; पाहा फोटो