in

आता तरी जागे व्हा … पोलिसाची हात जोडून विनंती पाहा व्हिडीओ

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यामुळे लग्न समारंभामध्ये 25 हून अधिक जणांचा सहभाग नसावा असे आदेस शासनानं दिलेत. मात्र या सर्व नियमांना पायदळी तुडवत खामगांव तालुक्यातील चिखली खुर्द येथील लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती पहावयास मिळाली. या ठिकाणी पोलिसांनी भेट दिली आणि कोरोना काळात शासनाने घालून दिलेले नियम पाळावेत या साठी वर वधू ना हात जोडून विंनती केली अचानक पोलीस आल्याचे पाहून घाबरलेले वर्हाडी पोलिसांच्या या विनम्र आवाहनामुळे खजील ही झाले.

अचानकपणे पोलिसांची भेट झाली अन. यावेळी लग्नसमारंभात २५ पेक्षा जास्त लोकांची गर्दी त्यांना त्यांना दिसून आली. मात्र पोलिसांनी उपस्थितांना हाथ जोडून विंनती केली की जगात कोरोना ने काय स्थिती निर्माण केली आहे आणि आपण काय करीत आहोत याची जाणीव करून दिली यावेळी वधु-वरासोबत सर्वांची एकच धांदल उडाली होती. वधूपिता ओकांर किसन दांदळे व वरपिता सुखदेव इंगळे रा. येनगाव ता. बोदवड जि. जळगाव यांच्यावर ७०/२०२१ कलम १८८ नुसार जलंब पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात आमदार हरवल्याची पोलिसात तक्रार

Oxygen Express |ऑक्सिजन ट्रेन महाराष्ट्रात दाखल