in

खळबळ! भाजपा उमेदवाराच्या गाडीत आढळलं ईव्हीएम

सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आसाममध्ये विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलं आहे. आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. भाजपा उमेदवाराच्या गाडीमध्ये ईव्हीएम आढळून आलं आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विरोधकांनी भाजपावर कठोर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

संबंधित कार भाजपा उमेदवाराची असल्यामुळे विरोधकांनी भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानं यावर स्पष्टिकरण दिलं आहे. ‘ ज्या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती कार भाजपा उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. पाल हे पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं कळालं, असं स्पष्टिकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे.

दरम्यान, नागरिकांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी गाडीमध्ये ना मतदान अधिकारी होता, ना निवडणूक आयोगाचा कर्मचारी. याप्रकरणी निवडणूक आयोगानं करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

प्रियंका गांधी यांनी यावरून केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. अनेकदा निवडणुकीच्या काळात ईव्हीएम खासगीत आढळल्यानंतर गोष्टी सारख्याच असतात. पहिलं म्हणजे गाडी भाजपा उमेदवारांची वा त्यांच्या सहकाऱ्यांची असते. या प्रकारच्या व्हिडिओंना घटनेच्या स्वरूपात स्वीकारलं जातं आणि नंतर फेटाळून लावलं जातं, असंही गांधी म्हणाल्या आहेत.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर राजकारण नको – महापौर

भारतात OnePlus 9 Pro ची विक्री सुरु