in

परमबीर सिंह यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात अकोल्यातील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध २२ कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप लावला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह विविध यंत्रणेकडे दिलं आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भीमराज घाडगे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lokshahi Helpline | ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्सचा तुटवडा असल्यास लोकशाही सोबत संपर्क साधा

Corona Update | देशात गेल्या २४ तासांत आढळले ३ लाख ७९ हजार रुग्ण