in ,

…अन्यथा ३ दिवसात लसीकरण बंद पडेल – राजेश टोपे

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरणाची परवानगी देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आज मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राला इतर राज्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा अशीही मागणी केली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

लसीकरण करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. जर एखादा रामबाण उपाय असेल तर आपल्यामध्ये प्रतिकारश्की निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लसीकरण महत्वाचा मार्ग आहे. लसीकरण मोफत आणि सुरक्षित आहे. पण लस मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी पोटतिकडीने विनंती केली आहे. खासकरुन कोव्हॅक्सिन द्या अशी मागणी केली आहे. का देऊ नये हा भागही आग्रहपूर्वक मांडला. लस दिली तर मोठा प्रश्न सुटेल,” असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी लॉकडाऊन हा शब्द वापरू नका असं आवाहन केलं. केवळ शनिवारी व रविवारी लॉकडाउन आहे.. बाकीच्या दिवशी फक्त निर्बंध आहेत असं त्यांनी सांगितलं. “गरज लागल्यास ऑक्सिजनचं प्रमाण इंडस्ट्रीसाठी शून्य करुन टाकू, ऑक्सिजनचा लागणारे स्टीलचे प्लांट बंद ठेवू…पण ऑक्सिजन कमी पडू देणार नाही,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RBI Policy | RBI कडून रेपो दर 4 % तर रिझर्व रेपोदर 3. 35 % वर स्थिर

परमबीर सिंह यांची चौकशी संपली