in ,

खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीच्या डोसचे दर निश्चित

कोरोना लसीकरण करणाऱ्या खाजगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारने दर निश्चित केले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांना देखील सरकारने ठरवून दिलेल्या दरांनाच लसीची विक्री करता येणार आहे.केंद्र सरकारने यासंदर्भात परिपत्रक काढलं आहे.

केंद्र सरकारच्या घोषणेनुसार कोविशिल्ड लसीच्या एका डोससाठी खासगी रुग्णालयांना ७८० रुपये आकारता येणार आहेत. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या डोससाठी १४१० रुपये आकारता येणार आहेत. तर रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीसाठी ११४५ रुपये आकारता येणार आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या नावाखाली रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना आता चाप बसणार आहे.

जीएसटी

दरम्यान, लसींच्या किंमतींवर ५ टक्के जीएसटी लागू करण्यात आल्याचं या परिपत्रकात नमूद केलं आहे. यानुसार, कोविशिल्ड लसीच्या प्रत्येक डोसवर ३० रुपये, कोवॅक्सिनच्या प्रत्येक डोसवर ६० रुपये तर स्पुटनिक व्ही लसीच्या डोसवर ४७ रुपये जीएसटी आकारण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्र सरकारनं दिली ७४ कोटी लसींची ऑर्डर

मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा