in

Remdesivir in Maharashtra: अखेर ज्यादाचे रेमडेसिवीर महाराष्ट्रात येणार… केंद्र सरकारचा निर्णय

राज्यातील रेमडेसिवीरचा वाढता तुटवडा पाहता अखेर केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा वाढीव साठा मंजूर केला आहे. २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत राज्याला ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीर देण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवदीप रिनवा यांनी २४ एप्रिल रोजी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी महराष्ट्राला ४ लाख ३५ हजारांचा रेमडेसिवीरचा साठा देणार असल्याची माहिती दिली.

रेमडेसिवीर मिळत नसल्याने नागरिकांचा संताप वाढायला लागल्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेमडेसिवीरचे वाटप करण्याचे आदेश सरकारने काढले. जागोजागी साठेबाज शोधण्याच्या कामाला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी लागले. अखेर लोकांच्या संतापाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या बैठकीत महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन व रेमडेसिवीर मिळावे अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील रेमडेसिवीर उत्पादनाचा आढावा घेऊन महाराष्ट्राला वाढीव रेमडेसिवीर देण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वी महाराष्ट्राला २,५९,२०० रेमडेसिवीर मंजूर केले होतो. देशातील सात प्रमुख रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या ११ लाख रेमडेसिवीरचा आढावा घेऊन यापूर्वी २१ एप्रिल ते ३० एप्रिलसाठीचे वाटप करण्यात आले होते. मात्र नव्याने यात वाढ होऊन सर्व कंपन्यांकडून १६ लाख रेमडेसिवीर उपलब्ध झाल्यामुळे नव्याने सर्व राज्यांच्या रेमडेसिवीर मागणीचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार सर्व राज्यांसाठी नव्याने रेमडेसिवीर पुरवठ्याचे फेरवाटप करण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona Update: चोवीस तासांत ६७, १६७ रुग्ण.. तर ६३,००० कोरोनामुक्त

CBI raid on Anil Deshmukh | “सीबीआयने बाहेरच्या वस्तू देशमुखांच्या घरी नेल्या”