in

चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपाची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?

भाजपाकडूनच मराठा आरक्षणाला विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही कागदपत्रे ट्विट केली असून, #SaveMeritSaveNation भाजपा व संघाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. यावरून सावंत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही सवाल केला आहे.

मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालाय रद्द केला. त्यानंतर राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली. राज्य सरकारने नीट बाजू मांडली नसल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. तर आरक्षण रद्द व्हावं म्हणून भाजपाकडून प्रयत्न केले गेले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावरून आता वाद रंगला असून, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी Save Merit Save Nation संघटना भाजपाशी आणि संघाशी संबंधित असल्याचं गौप्यस्फोट केला आहे.

“भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या #SaveMeritSaveNation या संस्थेचे भाजपा व संघाचे नागपूर कनेक्शन आहे. भाजपा पदाधिकारी मराठा आरक्षणविरोधामध्ये न्यायालयीन लढाईत सहभागी होते,” असा आरोप करत सावंत यांनी भाजपावर प्रहार केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे 1 जूनपासून राज्यभर आंदोलन

Maratha Reservation | माझं तुझं न करता आपण एकत्र येवू या – संभाजीराजे