in

रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीला आग

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा कंपनीला भीषण आग लागली आहे. एम आर फार्मा ही कंपनी केमिकल कंपनी असून या कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरली आहे. आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

लोटे एमआयडीसी मधील अपघाताची ही सहावी घटना मागील महिन्यात 20 मार्च रोजी लोटे एमआयडीसी मधील घरडा केमिकल कंपनी मध्ये भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाची तीव्रता जास्त होती या स्फोटात चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

CSK vs SRH:चेन्नई विरुद्ध हैदराबादमध्ये आज सामना