in

CSK vs RCB: चेन्नईचा ‘विराट’ विजय

चेन्नईने विराटसेनेचा विजयरथ रोखला आहे. चेन्नईच्या गोलंदाजांसमोर बंगळुरुला 9 विकेट्स गमावून 122 धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईनं 69 धावांनी हा सामना जिंकला.

चेन्नईने बंगळुरुसमोर विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.यामध्ये हर्षल पटेलनं टाकलेल्या शेवटच्या षटकात 37 धावा ठोकल्या. यात 5 षटकार आणि चौकाराचा समावेश आहे. रविंद्र जडेजाने 28 चेंडूत ६२ धावांची खेळी केली. तसेच त्याने ४ षटकात १३ धावा देत ३ गडी बाद केले. त्यात त्याने एक षटक निर्धाव टाकलं. इम्रान ताहिरनं २ गडी, तर सॅम करन आणि शार्दुल ठाकुरनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर बंगळुरुला 9 विकेट्स गमावून 122 धावाच करता आल्या. बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक 34 धावा केल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

औरंगाबादकरांची कोरोना लसींची चिंता मिटली

Maharashtra Rain | राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान खात्याचा इशारा