in

‘सौ दर्द छुपे है सीने मे…छगन भुजबळांची शायरीमधून टीका

महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. दरम्यान, विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ शेरोशायरीतून टोला लगावला आहे. “सौ दर्द छुपे है सीने मे, मगर अलग मजा है जीने मे”, अशा शायरीतून भुजबळ यांनी विरोधकांवर टीका केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने समता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आज पुण्यात आयोजन करण्यात आल होते. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना यावर्षी समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात छगन भुजबळ यांनी भाषण करताना शेरोशायरीतून विरोधकांवर चौफेर टोलेबाजी केली.

“महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. आजच्याच दिवशी मंत्रिमंडळाने शपथ घेतली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्याने अजूनही अनेकांना पचनी पडत नाही. हे सरकार खंबीर आहे. कुणी म्हणते हे सरकार आता पडणार, कुणी म्हणते फ्रेब्रुवारी, कुणी डिसेंबर तर कुणी १५ दिवसात हे सरकार जाणार, असे म्हणत आहेत. मात्र कुणीच कुठे जाणार-येणार नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार पूर्ण पाच वर्ष टीकणार. त्यानंतर पुन्हा निवडून येईल”, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली पिकअप गाडी; 5 जणांचा जागीच मृत्यू

ST Employee Strike | एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण…,अजित पवार म्हणाले