महानगरपालिका येथील संगीत शिक्षिका आणि शास्त्रीय गायिका,बॉलिवूड प्ले बॅक सिंगर, अभिनेत्री, समाजसेविका यासह समाजकार्यात हातभार लावणाऱ्या छाया साखरे यांचा ‘आय टी गोल्डन ग्लोब अवॅार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. साखरे यांना मिळालेल्या या अवॅार्डने त्यांचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
इंटरनॅशनल टॅलेंट मुंबई या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आय टी गोल्डन ग्लोब अवॅार्ड डॉ.संदीप सिंग, डॉ. दिनेश गुप्ता, डॉ.अनिता गुप्त यांच्या प्रमुख उपस्थितीत छाया साखरे यांना प्रदान करण्यात आला आहे. 25 मार्च रोजी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.
दरम्यान याआधी सुद्धा छाया साखरे यांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मुंबईचा आदर्श संगीत शिक्षिका पुरस्कार (मुंबई शहरात एकमेव महिला), महापौर पुरस्कार 2018, गुजरात गिरनार संगीत रत्न पुरस्कार, इम्पॅावारिंग वुमेन ऑफ इंडिया नॅशनल पुरस्कार, सावित्रीबाई फुले आदर्श संगीत पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार, संगीत कलारत्न पुरस्कार यासह विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर,संगीत कला अकादमीच्या प्राचार्य सुवर्णागौरी घैसस यांसह इतर वरिष्ठांनी छाया साखरे यांना मिळालेल्या अवॅार्डमुळे त्यांचे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Loading…