in

भाजपाचे अनेक नेते ‘भावी सहकारी’ होण्यास इच्छुक; बाळासाहेब थोरातांचा टोला

संतोष आवारे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना उल्लेखून केलेल्या ‘भावी सहकारी’ या वक्तव्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत. राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेना युतीची व भाजप नेते चर्चा सूरू आहे.आता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय जनता पक्षात मोठी अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपचे अनेक नेते आघाडीतील पक्षात येण्यास इच्छुक असल्याने ते भविष्यातील आमचे सहकारी होऊ शकतात असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘भावी सहकारी’ वक्तव्यावर दिले. अहमदनगरमध्ये ते बोलत होते.
भाजपची अवस्था पाहता त्यांच्यात नैराश्य आले आहेत. त्यामुळे अनेकजण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक आहेत. ते भाजप सोडून आघाडीतील कुणाकडेही जाऊ शकतात आणि भविष्यात आमचे सहकारी होऊ शकतात असे थोरातांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन वर्षापासून पाटील भविष्यवाणीच करतायत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मला माजी मंत्री म्हणू नका येते तीन दिवस वाट पहा असे सूचक वक्तव्य केल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांना विचारले असता, गेली दोन वर्षे ते अशीच मुदत देत भविष्यवाणी करत आहेत, मात्र आघाडीला काही धोका नाही, पुढील तीन वर्षे सरकार आरामात काम करेल आणि पुढेही करू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राची मंजुरी

Lalbaugcha Raja | नंदुरबारच्या तरूणाने साकारली लालबागच्या राजाची रांगोळी प्रतिमा