in

“बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना टोला

राज्यात वाढत चाललेल्या कोरोना महामारीला सामोरे जाताना सामान्य माणसाला योग्य ते उपचार मिळत नाही आहेत. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालीश आरोप करणे बंद करावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मंत्री नवाब मलिक यांना दिला.

आपले अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू आहे. सामान्य जनता चहुबाजूंनी संकटात असताना महाविकास आघाडीकडून आरोपांचे राजकारण चालू आहे. परंतु, राज्य सरकारने आता तरी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती एकवटली नाही तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लाेटे एमआयडीसीत भीषण स्फाेट; तिघांचा मृत्यू

अंबरनाथमध्ये ‘लोकशाही’च्या प्रतिनिधीला मारहाण… रुग्णालय स्टाफची दादागिरी