in

पालघरच्या बुलेट ट्रेनचा मार्ग काही अंशी मोकळा

नमित पाटील | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग काही अंशी मोकळा होत चालला आहे. मागील महिनाभरात 12 पेसा गावांनी हिरवा कंदील दिला आहे. तर अद्याप 11 पेसा गावांचा बुलेट ट्रेनला विरोध असल्याची माहिती पालघरचे भूसंपादन अधिकारी संदीप पवार यांनी दिली.

पालघर जिल्ह्यातील तलासरी , डहाणू , पालघर आणि वसई अशा चार तालुक्यांतील तब्बल 71 गावांमधून या बुलेट ट्रेनचा मार्ग जातोय. यापैकी आतापर्यंत 60 गावांनी संमती दिली आहे. यामध्ये 43 गावे पेसा अनूसूचित क्षेत्रातील आहेत. भूसंपादन कायद्याप्रमाणे भूसंपादन करत असताना ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे. यामध्ये 43 पैकी 32 गावांनी ग्रामसभेचा ठराव सकारात्मक दिला आहे. अजूनही 11 पेसा गावांची मंजुरी येण्याचं बाकी असल्याचं संदीप पवार यांनी सांगितल.

बुलेट ट्रेनसाठी पालघरमधील 26 हेक्टर जमीन थेट खरेदी करण्यात आली आहे, परंतु भूसंपादन अधिनियम 2013 नुसार प्राथमिक अधिसूचना साधारणता 60 गावांमध्ये झाली आहे, आणि 11 गावांमध्ये अद्याप प्रक्रीया बाकी आहे. तर थेट वाटाघाटीने खरेदी द्वारे भूसंपादनाची प्रक्रीया सूरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021 मध्ये आता प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये उपस्थित राहून मॅच पाहता येणार

Gold Silver Rate Today : सोन्याचा भाव वधारला, पाहा आजचे भाव