in

CM Uddhav Thackeray live; 18 ते 44 नागरिकांचे लसीकरण करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम त्यांनी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एखादी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाचे मुद्दे

 • लग्न समारंभात नियम पाळा
 • कोविडवर मात केल्याशिवाय राहणार नाही.
 • जून-जुलैपर्यत लसीचा पुरवठा सुरळीत होईल
 • 3 लाख लसी आल्या आहेत.
 • उद्या पहिली लस दिली जातेय शेवटची नाही
 • प्रत्येक राज्यासाठी लसीकरणाच वेगळ अॅप तयार करण्याची केंद्राला विनंती
 • 18 ते 44 नागरिकांचे लसीकरण करणार
 • 12 कोटी लशीची रक्कम देण्यास तयार
 • प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा आहे.
 • 1 कोटी 58 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण
 • तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी तयार राहुया
 • 7 कोटी लाभार्थ्यांना मोफत गहू, तांदूळ वाटप झाले आहेत.
 • पुढचे दोन महिने शिवभोजन मोफत
 • 3 कोटी 40 लाख नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा घेतला लाभ
 • 890 शिवभोजन केंद्रे
 • साडे पाच हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते.
 • जम्बो कोविड सेंटरचे
 • नाशिक, विरार सारख्या घटना दुदैवी
 • ऑक्सिजन प्लांट शेजारीच कोविड सेंटर उभारणार
 • रोज पावणे तीन लाख कोरोना चाचण्या
 • पावणे तीनशे प्लांट लावत आहोत.
 • तिसरी लाट आली तरी ऑक्सिजन कमी पडणार नाही
 • हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारणार
 • गेल्यावर्षी सारखा कडक लॉकडाऊन
 • आणखीन कडक लॉकडाऊन लावण्याची गरज नाही
 • नागरीक नियम पाळत आहेत.
 • रुग्णवाढ थांबवण्यात आपल्याला यश
 • रोजी मंदावेल पण रोटी मंदावू देणार नाही.
 • आरोग्य सुविधा वाढवत आहोत.
 • राज्यात प्रयोगशाळा 300 वर वाढवल्या.
 • राज्यात सध्या साडे पाच हजार कोविड सेंटर
 • राज्यात प्रयोगशाळा 300 पट वाढवल्या.
 • राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे.
 • रोज आता केंद्राकडून 35 हजार रेमडेसिवीर मिळतेय
 • रेमडेसिवीरचा योग्य वापर करा

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PBKS vs RCB Live | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाजीचा निर्णय

महाराष्ट्राला 12 कोटी लसीची गरज; एकरकमी चेक देण्याची तयारी