in ,

राज्यात लॉकडाउन? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक बोलावली आहे. दुपारी ४:३० वाजता ही बैठक होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार या बैठकीत निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला सचिव, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कडक निर्बंध लागणार की लॉकडाउन जाहीर करणार, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्येच लॉकडाउनसंदर्भात मतभिन्नता असल्याचं अनेकदा दिसून आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंही कडक लॉकडाउनला विरोध जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचं असणार आहे.

What do you think?

-4 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई पुन्हा कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता

‘लॉकडाउन नाही तर निर्बंध कडक करणार’