in

मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते हुतात्मा चौकात अभिवादन

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तथा राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी हुतात्मा चौकात अभिवादन केलं. 61 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री मुंबईतील हुतात्मा चौकात आले होते. यावेळी त्यांनी अभिवादन केलं.

दरम्यान, यावेळी यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने हा ६१वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण

गुजरातेत अग्नितांडव : कोव्हिड सेंटरमध्ये आग लागून १८ रुग्णांचा मृत्यू