in

विरार रुग्णालय दुर्घटना; जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ चौकशी समितीच्या अध्यक्षपदी

विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील भीषण आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ असणार असून, या समितीला येत्या 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत तब्बल 15 रुग्णांचा होरपळून मृत्यु झाला होता. या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला होता. त्यांनतर रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणी होत होती.

विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील भीषण आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी शासनाच्या वतीने पाच सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.ही समिती पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. तर या समितीत वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, पोलीस उप आयुक्त ( झोन-2 ) संजयकुमार पाटील आणि वसई-विरार महापालिका अग्निशमन दल प्रमुख अधिकारी दिलीप पालव यांचा समावेश आहे. या समितीला आता विरार दुर्घटनेबाबतचा चौकशी आहवाल येत्या 15 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मे महिन्यात 9 दिवस बँका बंद

RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने