in

परमबीर सिंहांच्या गृहमंत्र्यांवरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीला येत्या ६ महिन्यांमध्ये या चौकशीचा अहवाल राज्यशासनकडे सादर करायचा आहे.

मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटींचे हप्ते वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते.मुंबईतील मद्यालये, पब्ज आणि हुक्का पार्लरचालकांकडून महिन्याला ४०-५० कोटी रुपयांचे हप्ते जमा होऊ शकतात आणि अन्य मार्गांनी उर्ररित रक्कम जमा करता येतील, अशा सूचना देशमुख यांनी दिल्या असल्याचे आरोप केले.

दरम्यान आता परमबीर सिंहांच्या गृहमंत्र्यांवरील आरोपांची चौकशी होणार आहे. यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती नेमली आहे. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल येत्या ६ महिन्यांमध्ये शासनाला सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्या भूमिपूजन

रश्मी ठाकरेंना रिलायन्स रुग्णालयात केलं दाखल