in

गेहनाचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला

पोर्नोग्राफी प्रकरणी गेहना वसिष्ठचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आपला निकाल राखून ठेवला असून निकाल मंगळवारी जाहीर केला. दरम्यान मुंबई पोलिसांनी गेहनाविरोधात आयपीसी कलम 370(मानवी तस्करी) लावण्याची मागणी करत सत्र न्यायालयात अर्ज सादर केला आहे.

अश्लील चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गेहना वाशिष्टनं पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक होऊ नये, म्हणून गेहनाने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायासयात अर्ज दाखल केला होता. तो फेटाळ्यात आल्यानंतर तिनं हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिका याचिकेवर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. गेहनाची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडे आवश्यक ती सर्व माहिती आहे. याआधी तिला अटकही करण्यात आली होती. ज्यात चार महिन्यांहून अधिकाकाळ ती कारागृहात होती. ती तुरुंगात असतानाच तिच्याविरोधात दुसरी एफआयआर नोंदविण्यात आली आणि सुटल्यानंतर तिसरी एफआयआर नोंदविण्यात आली.

तिसऱ्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले असून आरोपींनी पीडितांना चुंबन आणि लैंगिक दृश्ये करण्यास भाग पाडलं. तसेच वेबसीरिजची दृश्य एक खोलीत काही लोकांच्या उपस्थितीत चित्रीत करण्यात आली. तक्रारदार महिलेनं त्या चित्रपटाचे प्रमोशनही केलं होतं. त्यामुळे इथे पोलिसांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेणेकरून आम्ही मोठ्या लोकांची नावं जाहीर करू मग ते आम्हाला जामीन मिळू देतील. तसेच चौथी एफआयआर दाखल करून पुन्हा अटकहीहोऊ शकते असा आरोप गेहनाच्यावतीनं करण्यात आला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यंदाच्या वर्षीही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा ‘ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव’

परमबीर सिंग यांना ५० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी