in ,

कोरोनामुळे देशात ३,६२१ बालके अनाथ

कोरोना वैश्विक महामारिच्या संकटांमुळे कधी न भरून निघणारं नुकसान कित्येकांचे झाले आहे. करोनाच्या साथीत अनेकांनी आपले आप्तजन गमावले. अनेक मुलांचे आई व बाबा असे दोन्ही या साथीत मरण पावल्याने ते अनाथ झाले असून या मुलांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे येत आहेत. पण आईबाबांची  छत्रछाया निघून गेल्याचे मोठे दु:ख त्यांना सोसावे लागत आहे.

आईवडिलांच्या मृत्यूमुळे या मुलांचा भावनिक आधार गेला असून अनेकांचे आर्थिक पाठबळ कायमचे हिरावले गेले आहे, त्यामुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या माहितीनुसार ३ हजार ६२१ बालके अनाथ झाली असून २६ हजार मुलांचे आई किंवा बाबा यांच्यापैकी एक कुणीतरी साथीत बळी पडले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इगतपुरी परिसरामध्ये जमावबंदी लागू

जगातील सर्वात मोठ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; ३९ पत्नी, ९४ मुलं असलेल्या व्यक्तीचं निधन