in

पुण्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनाने मृत्यू

पुणे शहरात एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. विशेष म्हणजे या कुटुंबातील श्यामसुंदर कुचेकर हे महापालिकेच्या आरोग्य सेवेत कार्यरत होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात होत असून एकाच कुटुंबातील तीन ते चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.

पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रात कचरा व्यवस्थापनात कार्यरत असलेले श्यामसुंदर कुचेकर यांच्यासह कुटुंबातील 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. पुणे मनपा आरोग्य सेवेत कार्यरत असतानाच आपली जबाबदारी पार पडत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. श्यामसुंदर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर वडील लक्ष्मण कुचेकर, आई सुमन कुचेकर, भाऊ विजय कुचेकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र या कुटूंबातील मनीषा या कोरोनातुन बऱ्या झाल्या आहेत.एकाच कुटुंबातील 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी राज्यात 66, 836 रुग्ण

PBKS vs MI: पंजाबला विजयासाठी 132 धावांचे आव्हान