in

सावधान… कोरोना रुग्णांच्या आणखी संख्येत वाढ

राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असताना बुधवारी दिवसभरात संपूर्ण राज्यात तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,12, 980 वर पोहोचला आहे. बुधवारी राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठी भर पडल्याचं पाहायला मिळालं.

कोरोना रुग्णसंख्येत धडकी भरवणाऱ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असतानाच बुधवारी तब्बल 2400727 रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. परिणामी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झालं आहे. कोरोना रुग्णसंख्येतील हा चढ- उतार सुरु असतानाच आजच्या दिवशी कोरोनामुळं दगावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणारा ठरला. दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. परिणामी आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे.


राज्यात सध्याच्या घडीला 3, 56, 243 इतके सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्याची ही स्थिती असतानाच राजधानी मुंबईतही कोरोनाचा धोका कायम आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याचं खुलं आव्हान

वाझेचा आणखी एक ‘कार’नामा; आठवी गाडी एनआयएच्या ताब्यात