in

शिरूरमध्ये रहिवाशी शाळेत ४८ मुलींसह ९ शिक्षक कोरोनाबाधित

दिवसेंदिवस शहरांसोबतच ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.

शिरूर शहरालगत असणाऱ्या एका रहिवाशी मुलींच्या शाळेतील ४८ मुली व नऊ शिक्षक अशा एकूण ५७ जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोग्य विभागासह सर्व अधिकाऱ्यांनी शाळेची पाहाणी केली आहे.

शिरूर येथील निवासी शाळेतील मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची व शिक्षकांची शासकीय रुग्णालयामार्फत तपासणी करून औषध उपचार सुरू करण्यात आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्यात 63,309 नवे कोरोनाबाधित

ठाण्यात आज लसीकरण बंद!