in

उत्तर भारतात कोरोना स्थिती चिंताजनक

उत्तर भारतातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारही हादरून गेले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड येथील स्थिती बिघडत चालली आहे.
कुंभमेळ्यानंतर किमान ५० साधूसंतांना कोरोना झाला आहे.

लागण झालेल्या बाधितांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. राज्यात कुंभमेळ्यामुळेच ही स्थिती उद्भवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद, वाराणसीसह अनेक शहरांत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे.

सोमवारी सकाळपर्यंतही संचारबंदी लावण्यात येणार आहे. मास्क न लावणाऱ्याकडून एक हजार रुपये दंड आकारला जाईल. तसेच दुसऱ्यांदा तीच व्यक्ती मास्कविना आढळल्यास १० हजार दंड केला जाईल.

दुसऱ्या लाटेत संसर्ग अतिशय वेगाने पसरत आहे. भारतात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले. २४ तासांमध्ये ११८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘कोरोना वाढण्यास आम्ही राजकीय नेतेही काही प्रमाणात दोषी’

Sonu Sood Corona | बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह