in

वुहानमधूनच कोरोनाचा फैलाव?

कोरोना महामारीने गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घातला असून त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली याबाबत अद्यापही वाद सुरु आहे. चीनमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा अनेक देशांचा आरोप असून चीन मात्र हा आरोप फेटाळण्यात आलं आहे. दरम्यान वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून करोनाचा फैलाव झाल्याचा दावा केला जात आहे तेथील तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी जगाला करोना संसर्गाची कोणतीही कल्पना नव्हती. वॉल स्ट्रीट जर्नलमधील रिपोर्टच्या आधारे रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.

वॉल स्ट्रीट जर्नललच्या रिपोर्टनुसार, चीनने जगासमोर करोनाची माहिती जाहीर करण्याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (WIV) तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार तिन्ही कर्मचाऱ्यांमध्ये करोनासारखी लक्षणं होती. यामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टचा उल्लेख करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९ नंतरच डिसेंबर-जानेवारीदरम्यान जगाला करोना महामारीची माहिती मिळाली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विधान परिषद नामनियुक्त सदस्यांची यादीच उपलब्ध नाही

Coronavirus | आतापर्यंत देशात तीन लाखांहून अधिक कोरोनामुळे मृत्यू