in

”पंतप्रधान मोदी- शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोना पसरला”

शेतकरी आंदोलनामुळे कोरोना पसरला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे कोरोना पसरला असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाचं स्वरुप, बंगालमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या विषयांवर चर्चा झाली.

या भेटीनंतर पत्रकारांनी शेतकरी आंदोलनामुळे कोरोना पसरत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर टिकैत यांनी आम्ही कुठलीही मोठी बैठक घेत नाही, ज्याने कोरोना पसरु शकतो. आम्ही सगळेजण कोरोना नियमांचं पालन करुन आंदोलन करत आहोत. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या वेळी कोरोनाचा भरपूर प्रसार झालेला असून ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि अमित शाह यांच्या बैठका झाल्या आणि त्यामुळे कोरोना अजूनच पसरला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | दिवसभरात १६ हजार ३७९ रुग्ण कोरोनामुक्त

आता लहानमुलांसाठी येणार ‘कोरोना लॉलीपॉप टेस्टींग किट’