in

Corona Update | मागील 24 तासांत 3.54 लाख नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी एका दिवसांत तब्बल 3 लाख 54 हजार 531 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असून काल कोरोना मृतांच्या आकड्यानेही विक्रमी झेप घेतली आहे. काल दिवसभरात एकूण 2806 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशाच्या चिंता वाढताना दिसत आहेत.

मागील काही दिवसांपासून देशात सर्वाधिक नवीन रूग्णांची आणि मृतांची नोंद होत आहे. देशात सलग सहाव्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा साडेतीन लाखांहून अधिक नोंदवला गेला आहे. देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 73 लाख 4 हजार 308 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर मृतांची संख्या 1 लाख 95 हजार 116 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर कोरोना संसर्गातून बरं होणाऱ्यांचं प्रमाणही घटलं आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू

देशात मागील चोवीस तासांत मृत्यू झालेल्या 2806 रुग्णांपैकी 832 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याव्यतिरिक्त दिल्लीत 350, उत्तर प्रदेशात 206, छत्तीसगडमध्ये 199, कर्नाटकात 143, गुजरातमध्ये 157, झारखंड 103 आणि बिहारमध्ये 350 लोकांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bengal Election | कोरोना संकटात पश्चिम बंगालमध्ये आज सातव्या टप्प्यासाठी मतदान

आज सर्वोच्च न्यायालयात ठरणार गोकुळ निवडणुकीचा फैसला