कोरोना सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय २०२१ मध्ये भारतात ६३१ मृत्यू झाले असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६६ हजार २०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात देशात १ लाख १५ हजार २६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी ५ एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी २५ लाख ८९ हजार ६७ इतकी झाली आहे.
गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाकाळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने रुग्णवाढ नोंदविण्यात येत असून नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी २७ लाख ९९ हजार ७४६ इतकी झाली आहे. तसंच अॅक्टिव्ह करोना रुग्णांची संख्या ८ लाखांवर पोहोचली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५५ हजार रुग्णांची नोंद झाली असून दिल्लीत ५१०० नवे रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.
Comments
Loading…