in

Corona Update | आजवर एका दिवसातील सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९१ लाख ८३ हजार १२१ वर पोहचली आहे. देशात आत्तापर्यंत २ कोटी ७६ लाख ५५ हजार ४९३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ५९ हजार ६७६ वर पोहचलीय.

मात्र गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात बुधवारी (९ जून २०२१) ९४ हजार ०५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ६१४८ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आजवरचा एका दिवसतला सर्वाधिक कोरोना मृत्यूचा आकडा ठरला आहे.

देशाचा पॉझिटिव्हिटी रेट ४.९६ टक्के आहे. सलग तिसऱ्या दिवशी भारतात एक लाखांहून कमी करोनाबाधितांची नोंद झालीय. बुधवारच्या दिवसात १ लाख ५१ हजार ३६७ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वीज पडल्याने बालिकेचा मृत्यू

गोंदियामध्ये गारपीटसह वीज पडल्याने गाय, बैलचा मृत्यू