in

Corona Updates | देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या विक्रमी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रोज नवीन विक्रम होत असून गुरुवारी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताने रोजच्या कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत आता अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. गुरुवारची कोरोना रुग्णसंख्या ही जगातील कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीचा एक विक्रम आहे. गुरुवारी देशात 1,93,279 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्या आधी बुधवारी देशात 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 2104 रुग्णांनी जीव गमावला होता.

देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 62 लाख 63 हजार 695
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 36 लाख 48 हजार 159
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 24 लाख 28 हजार 616
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 86 हजार 920
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 54 लाख 78 हजार 420 डोस

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. गुरुवारी राज्यात 67 हजार 13 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 62 हजार 298 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.34 टक्के झाले आहे. राज्यात आज 568 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के एवढा आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mansukh Hiren Case | पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक

Nashik Oxygen Leak | नाशकातील ऑक्सिजन गळती कशी घडली? पाहा सीसीटीव्हीचे फुटेज