in

Corona Vaccination | लसीकरणाच्या किंमतीबाबत सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

कोरोना लसीकरणाच्या तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असून, १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसींच्या किमती समान हव्यात, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

सीरम इन्स्टिट्यूटने अलीकडेच कोरोना लसींची किंमत जाहीर केली होती. त्यानंतर त्यात १०० रुपयांची कपातही केली. मात्र, देशभरात कोरोना प्रतिबंधक लस प्रतीडोस १५० च्या समान दराने पुरविली जावी, असे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी या याचिकेवरील सुनावणीस नकार देत याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. आम्हाला परिस्थितीची कल्पना आहे आणि लोकांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी सतत केंद्र आणि राज्य सरकारला सांगत आहोत, या शब्दांत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CoronaVirus | कोरोना महामारीमुळे चार धाम यात्रा रद्द

MI vs RR | राजस्थानच्या जोस बटलर आणि जयस्वालची ‘यशस्वी’ सुरुवात