राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना वयस्कर, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन लस देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारने फेटाळला आहे. घरोघरी म्हणजेच डोअर टू डोअर जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्र सरकारचं कोणतही धोरण नसल्याचं सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे मात्र केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाण्यासंदर्भात माहिती दिली होती. लोकांना दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागू नये म्हणून ही मोहीम राबवली जाण्यासंदर्भातील भाष्य आरोग्यमंत्र्यांनी केलं होतं.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त सचिव सुरेश काकानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुंबईमध्ये जवळजवळ दीड लाख लोकं असे आहेत जे अंथरुणाला खिळून आहेत किंवा अपंग आहेत. हे लोकं लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही. याच लोकांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्राकडे परवानगी मागितली होती. मात्र केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केंद्राची असं कोणतही धोरण नाही असं आम्हाला सांगितलं. जर ही परवानगी मिळाली असती तर या लोकांना नक्कीच फायदा झाला असता.”
Comments
Loading…