in ,

Corona Vaccine | शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस

देशात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून तिसऱ्या टप्प्यात ६० वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. त्यावेळी, पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर, आज, बुधवारी तब्बल 40 दिवसांनी शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1 मार्च रोजी दुपारी तीनच्या दरम्यान मुंबईतील रुग्णालयात करोनावरील लस घेतली. ‘आज मुंबईतील जे.जे. रुग्णालयात करोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन करोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन शरद पवारांनी दुसऱ्यांदा कोरोना लसीचा डोस घेतल्याचा फोटो शेअर केला आहे.

”आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!.”, असे पवार यांनी ट्विट केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंह NIAच्या कार्यालयात दाखल

मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा-महापौर